अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून श्रध्येला आधुनिकतेची जोड देण्यात आल्याने स्वामी भक्तांना आवश्यकत्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, कार्यरत असलेले अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे उपसचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे पुरोहित विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अक्कलकोट नगरपरिषदेचे घरकुल विभागाचे प्रथमेश अळ्ळोळी हे उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब पोळ, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रवीण देशमुख, प्रवीण घाटगे, शुभम सावंत, दत्ता मोरे, किरण साठे, यश विभूते, विनायक भोसले, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, रोहित कदम, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Post Views: 38