पंढरपूर – येथे ज्येष्ठ अधिकमासानिमित्त परमपूज्य श्रीमान काशी सिंहासिन समाधीश्वर श्री श्री १००८ जगद्गुरुडॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची धर्मसभा व ग्रंथ दिंडी सोहळा विराटमंगल कार्यालय फरतळे मठ भक्ती मार्ग येथे उत्साहाने पार पाडला.
वीरशैव लिंगायत समाज टाकळी रोडपंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने शुक्रवारी(दि.१२ जून ) श्रीमान सिंहासनाधीश्वर श्री श्री १००८ जगद्गुरुडॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या धर्मसभेचे व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पंढरपूर शहर व ग्रामीण परिसरातील सर्व वीरशैवलिंगायत समाज बंधू बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने करण्यात आला. ग्रंथदिंडीचे मिरवणूक पालखी द्वारे आद्य वीरशैव लिंगायत भजनीमंडळ यांच्या उपस्थित मिरवणुकी द्वारे करण्यात आले. ग्रंथदिंडीचे पूजन पंढरपूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष युवराज डोंबेयांनी सप्तनीक केले. ग्रंथदिंडीनंत
र श्री श्री १००८ जगद्गुरुडॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व गुरु सदाशिव शिवाचार्य वेळापूरकर महाराजयांचे कार्यक्रम स्थळी जयघोषात स्वागत करत आगमन झाले. श्री श्री शैल्य कारभारी यांनी सपत्नीक पूजन व औक्षण केले. महाराजांच्या व्यासपीठाच्या मार्गावर फुलांच्या पायघड्याघालून जगद्गुरूंचे व्यासपीठावर आगमन झाले. दीपप्रज्वलन वप्रतिमापूजनाने धर्मसभेचा प्रारंभ झाला. प्रास्ताविकरामेश्वर कोरे यांनी केले. श्री गुरु सदाशिव शिवाचार्य यांनीसुरुवातीला धर्मसभेत संबोधन केले. तदनंतरश्रीमान काशी ज्ञान सिंहासन देशवर १००८ जगद्गुरु यांनी अधिक मास महिन्याचेमहत्व आपल्या अमृतवाणीतून विषद केले. सर्व समाज बांधव त्यांच्या अमृतवाणीने मंत्रमुग्ध झाले. महास्वामीजींची पाद्यपूजा योगेश आंधळकर यांच्या कुटुंबानेकेली. प्रशांत शेटे यांनी महास्वामीजी यांना महावस्त्र अर्पणकेले. कार्यक्रम समाप्तीनंतर राहुल म्हमाने व बसवराज बिराजदार यांनी प्रसाद वाटप केला.
दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शोभाताई कराळे यांनी केले. त्यानंतर टाकळी रोड लिंगायत समाजाचेअध्यक्ष सिद्धेश्वर कोरे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सुभाष खटावकर, श्री.ऐनापुरे, स्वामी बिरगीकर, अण्णाराय कोरे, संजय पाटील, नागेश कुंभार, धनंजय म्हमाने, प्रशांत यावगल, दत्ता धोत्रे, श्री.दुरुपे, भार्गव शेटे, नितीन गुळवे, संतोष हत्तर्गी,बसवराज मरळे, सिद्धेश्वर बिराजदार, गणेश औसेकर आदी उपस्थित होते.
Post Views: 14