कुर्डूवाडी – सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालय कुर्डूवाडी येथे माढा व करमाळा तालुक्यातील सर्व ८० मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे . मतदान केंद्राध्यक्ष म्हणून उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांनी काम पाहिले .
सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली नऊ वाजेपर्यंत एकाही मतदाराने मतदान केले नाही नऊ वाजता पहिले मतदान बेंबळे तालुका माढा येथील जिल्हा परिषद सदस्या सविता संजय कोकाटे यांनी केले दहा वाजता मतदानाला वेग पकडला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या नियोजन नुसार प्रथम माढा तालुक्यातील मतदारांनी मतदान करायचे यानंतर करमाळा तालुक्यातील मतदारांनी मतदान करायचे याप्रमाणे मतदान करण्यात आले 12 वाजायच्या आत सर्व मतदान संपत आले होते .
परंतु एक वाजता तीन मते शिल्लक राहिली होती करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य अजित तळेकर सह दोन मते एक वाजता झाली यानंतर साधारण दोन वाजण्याच्या दरम्यान शेवटचे माढा नगरपंचायतीच्या नगरसेविका अर्चना आनंद कानडे यांचे मतदान झाले यानंतर प्रशासन निर्धास्त झाले यावेळी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
मतदान चालू असताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली यासह भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी मतदार केंद्राला धावती भेट दिली यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल जि प सभापती अमृता वाघे रणजितसिंह शिंदे प्रा शिवाजीराव सावंत यशवंत शिदे शिवाजी कांबळे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील आसीफ तांबोळी यासीन बहामद बाळासाहेब पाटील हरिदास रणदिवे सह सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .