बार्शी – उपळे दुमाला येथील सहारा वृद्धाश्रमात उद्योजक रौनक नंदकिशोरजी पल्लोड, सौ. सोनल विकास भुतडा लातूर तसेच तृप्ती अर्पितजी राठी पुणे यांच्यावतीने अधिकमासानिमित्त अन्नदान, वस्त्रदान, २१ स्टीलचे ताट, २१ प्रकारचे मिठाई, बिस्किट, फळे यांचे वाटप वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांना करण्यात आले.
तसेच सुषमा भराडिया बार्शी यांच्यावतीने साखर व आंघोळीचे साबण देण्यात आले व प्रमोदजी मालपाणी यांच्याकडून विविध प्रकारची बिस्कीटे वितरित करण्यात आली. पुरणपोळीचे सुग्रास जेवण देखील देण्यात आले. शोभा नंदकिशोरजी पलोड या अशा सामाजिक उपक्रमात नेहमीच हिरोरिने भाग घेत आपल्या दिलदार स्वभावाने सढळ हस्ते नेहमीच मदत करण्यात तत्पर असतात.
राजस्थानी महिला मंडळ बार्शी अंतर्गत हा दिव्य असा अधिकमासनिमित्त दान कार्यक्रम पार पडला. बार्शीहून जवळपास २० महिलांची उपस्थिति होत्या. सहारा वृद्धाश्रमाचे संस्थापक राहुल भड यांनी सर्वांचे आभार मानले.
Post Views: 16