Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एमएसएमई दिनानिमित्त वाशी येथे 27 जून रोजी शिखर परिषद व पुरस्कार वितरण सोहळा

तरुण भारतbyतरुण भारत
June 18, 2026
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जालना : जागतिक बँकेच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या ‘रॅम्प’ (Raising and Accelerating MSME Performance – RAMP) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे 27 जून, 2026 रोजी वाशी येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एमएसएमई शिखर परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यभरातील सुमारे 3 हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजक आणि प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या शिखर परिषदेचा उद्देश उद्योग क्षेत्रातील अग्रणी व्यक्ती, तज्ज्ञ, धोरणकर्ते तसेच एमएसएमई क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणून उद्योगवृद्धी, सहकार्य, नवकल्पना, शाश्वतता आणि जागतिक बाजारपेठेतील संधी यांवर सखोल चर्चा घडवून आणणे हा आहे. या परिषदेदरम्यान रॅम्प उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करून व्यवसायात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या सूक्ष्म व लघुउद्योगांना (MSME) विशेष एमएसएमई पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्पादन क्षमता, नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत विकास आणि उद्योगातील उत्कृष्ट कामगिरी या निकषांच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

एमएसएमई शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजकांनी ttps://mahamsmeawards.in/summit या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतरच परिषदेत सहभाग निश्चित मानला जाणार आहे. तसेच पात्र सूक्ष्म व लघुउद्योगांनी https://mahamsmeawards.in या संकेतस्थळावर एमएसएमई पुरस्कारांसाठी नामांकन (Nomination) सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील एकूण आठ श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्कारांसाठी पात्रता

एमएसएमई पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या उद्योगांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे :

  •           उद्योग महाराष्ट्रात नोंदणीकृत असावा व किमान तीन वर्षांपासून कार्यरत असावा.
  • संबंधित उद्योगाने रॅम्प कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला असावा.

यामध्ये आरबीएसएमएस (Raising & Business Support Measures), क्षमता विकास (Capacity Building), एव्हीडीपी (Advanced Vendor Development Programme) तसेच कौशल्य विकास (Skill Development) आदी योजनांचा समावेश आहे. जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी जिल्ह्यातील पात्र सूक्ष्म व लघुउद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत शिखर परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नोंदणी करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यो. रा. सारणीकर यांनी जालना जिल्ह्यातील उद्योजकांना परिषदेत सहभागी होऊन उद्योग क्षेत्रातील नव्या संधी, तांत्रिक प्रगती आणि व्यवसायवृद्धीसाठी उपयुक्त मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Post Views: 76
Previous Post

एन निनो’ च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

Next Post

नशामुक्त भारत अभियानांतर्गत ‘विकसित भारत की पहचान’ उपक्रमास प्रारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नशामुक्त भारत अभियानांतर्गत ‘विकसित भारत की पहचान’ उपक्रमास प्रारंभ

ताज्या बातम्या

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

मंद्रूप परिसरात परतीच्या पावसामुळे अंशतः दिलासा

September 21, 2026
श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1243911

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!