अक्कलकोट – ग्रामीण विकास मिशन भारत (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत सोलापूर व लातूर जिल्ह्यांच्या प्रकल्प संचालकपदी . रेखा लक्ष्मण सोनकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण विकास मिशनचे प्रमुख अधिकराव जगताप देशमुख यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
ग्रामीण विकास मिशनच्या माध्यमातून ग्रामविकास, कृषी विकास, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, जलव्यवस्थापन, कौशल्य विकास आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रांत काम करण्यात येत आहे. महाराष्ट्रात एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून मिशन कार्यरत असल्याची माहिती प्रमुख अधिकराव देशमुख यांनी दिली.
नियुक्तीनंतर रेखा सोनकवडे यांनी सोलापूर व लातूर जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतींनी ग्रामीण विकास मिशनमध्ये सहभागी होऊन गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यांच्या नियुक्तीबद्दल मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .
Post Views: 19