
पदमनगर बास्केटबॉल अकॅडमीच्या वतीने आंतरर्राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त खेळाडूंना योगाचे महत्व व योगासनांचा सराव करुन घेण्यासाठी भारतीय योग संस्थान केंद्र दिल्ली सोलापूर शाखा इंद्रभुवन सोलापूरचे योग प्रशिक्षक श्री नागेश सिद्राम कन्नूरकर , श्रीमती अंजली प्रकाश वीटकर व बीबी दारफळ गणेश विदयालयाचे माजी मुख्याध्यापक श्री श्रीशैल महादेव गुरव यांनी हजर राहून योगासने करुन दाखवली व खेळाडूंकडून करवून घेतले. याप्रसंगी योगासने व ध्यानाचे महत्व श्रीमती अंजली वीटकर मॅडमनी सांगितले तर आहाराचे महत्व श्री नागेश कन्नूरकर सर यांनी सांगितले बाजारात मिळणारे फास्ट फूड न खाता घरात आईने तयार केलेले पदार्थ खावेत असा सल्ला त्यांनी खेळाडूंना दिला. तर योग दिनाच्या वेळी बास्केटबॉल अकॅडमीचे खेळाडू , त्यांचे पालक व प्रशिक्षक उपस्थीत होते. योगासनांचा सराव झाल्यानंतर श्रीमती अंजली वीटकर मॅडम यांचा सत्कार शाल व नॅपकीन बूके देवून ऐश्वर्या होनकोरे व अर्चना बोमडयाल मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री नागेश कन्नूरकर सर यांचा सत्कार शाल व नॅपकीन बूके देवून श्रीधर गायकवाड सर यांनी तर श्री श्रीशैल गुरव सर यांचा सत्कार शाल व नॅपकीन बूके देवून श्री प्रबुध्द चिंचोलीकर सर व श्री मार्गम पालक यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन श्री आनंद वलाकाटी सर यांनी केले.
Post Views: 77