गांधी नाथा रंगजी दिगंबर जैन जन मंगल प्रतिष्ठान संचालित गांधी नाथा रंगजी विधद्यालयात बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिवस संस्थेचे अध्यक्ष संजय गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहत साजरा करण्यात आला. या योग दिनाचा उद्धघाटन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सरोजना मुलिटी माध्यमिक विभागाच्या स्मिता रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संगीता नरे यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले.
या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी वृक्षासन ताडासन पदहस्तासन त्रिकोणासन अर्धचक्रासन वज्रासन पर्वतासन शशांकासन पवित्रासन भुजंगासन मकरासन असे बैठे व उभे योगासनाचे प्रकार मुख्याध्यापिका सरोजना मुलिटी क्रीडा शिक्षक शिवानंद सुतार गार्गी पोते अनुष्का सुपाते यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले व सर्व विद्यार्थ्यांनी योगासन केले. कपालभारती, भ्राभरी व योग साधनेने शेवट करण्यात आली.
या याप्रसंगी सरोजना मुलींटी स्मिता रणदिवे ज्योती दुर्गे पालक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया मल्लाडे यांनी केले व डॉक्टर वैशाली सरवदे यांनी योगासनाच्या प्रकारे घेतले तर आभार शिल्पा हेडगिरे यांनी मानले
Post Views: 41