बार्शी – आचार्य विनोबा भावे शिक्षक समृद्धी कार्यक्रमांतर्गत पोस्ट ऑफ द मंथ’ हा पुरस्कार जि.प. प्राथ. शाळा नं. २, उपळाई ठोंगे येथील वर्गशिक्षिका श्रीमती दिपाली भास्कर गोरे यांना प्रदान करण्यात आला.
गटशिक्षण अधिकारी गजानन बाजड, विस्तार अधिकारी बालाजी नाटके आणि धनाजी जाधवर यांच्या हस्ते श्रीमती गोरे यांना प्रमाणपत्र व ‘Education Heroes in ACTION’ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल रामकृष्ण काळे, सर्व शिक्षकवृंद आणि शालेय व्यवस्थापन समिती यांनी श्रीमती दिपाली गोरे यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रसंगी अधिकारी वर्गाने दिपाली गोरे यांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचे व विनोबा ॲपवरील सक्रिय सहभागाचे कौतुक केले.