जेऊर – करमाळा शहरातील योग व संगीतशिक्षक बाळासाहेब नरारे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दादासाहेब फाळके प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार डॉ. सुरेश राठोड फाऊंडेशन संचलित इंडियन पोलीस मित्र भारत व विशेष कार्यकारी अधिकारी न्याय हक्क जनजागृती फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर करण्यात आला आहे. प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय, प्रेरणादायी व समाजोपयोगी कार्य करून राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला असल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या सामाजिक बांधिलकी, कर्तृत्व आणि यशाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या पुरस्काराचे वितरण 27 जून रोजी पुणे पत्रकार भवन, पुणे येथे होणार आहे. प्राचार्य नरारे यांना हा पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Post Views: 48