सोलापूर: ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एका पती आणि सासूवर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादीचा छळ केला.
आनंद मित्र गोत्री आणि मंगल मित्र गोत्री राहणार वांगी रोड सोलापूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी पती व सासूची नाव असून याबाबत वर्षा मित्रगोत्री (वय ३० वर्ष ) यांनी फिर्याद दिली आहे. यातील फिर्यादीचा विवाह पती आनंद यांच्या सोबत झाला होता.२० फेब्रुवारी २०२३ ते २५ जून २०२६ या कालावधीत फिर्यादी या सासरी नांदत असताना आरोपीने फिर्यादीला मुलींसह चर्चमध्ये जाऊन ख्रिश्चन धर्म स्वीकार, असा तगादा लावत दारूच्या नशेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केली. “जर धर्म स्वीकारला नाही, तर तुला घरात राहू देणार नाही, घराबाहेर जा अन्यथा तुला घटस्फोट देतो, असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला घरातून बाहेर काढले. तसेच, पुन्हा घरात आल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार कुंभार हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 11