
सांगोला – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, नाझरा येथे सोलापूर जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास सांगोला पं.स.उपसभापती अजय सरगर, पं.स.सदस्य डॉ.सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप देवकते, वैद्यकीय अधीक्षक डॉ.ओंकार कोरे, संजय शेळके, भालचंद्र भंडारे, रमेश पाटील, नामदेव आलदर, प्रवीण पाटील, तालुका आरोग्य सहा.अधिकारी डॉ.जिलानी काझी यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, परिचर, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचवूया…पोलिओमुक्त भारत घडवूया ! असा निर्धार व्यक्त केला.
चौकट-
“दोन थेंब…आयुष्यभराचे संरक्षण”चा संदेश
“दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण!” हा केवळ संदेश नसून प्रत्येक बालकाच्या निरोगी भविष्याची हमी आहे. निरोगी बालक हेच सक्षम राष्ट्राचे भविष्य आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे.
-चेतनसिंह केदार-सावंत, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती
Post Views: 10