आज दिनांक 29 जून 2026 रोजी सावित्रीमाई फुले शिक्षण व बहुद्देशीय संस्था व साप्ताहिक श्री संकेत यांच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त द्वारकाधीश मंदिर जुळे सोलापूर या ठिकाणी *सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आस्था सामाजिक संस्थेस सावित्री रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले*
या पुरस्काराचे स्वरूप फेटा शॉल सन्मानपत्र ट्रॉफी असे होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महादेव कोगनुरे ( एस.के फाउंडेशन अध्यक्ष) श्री रामप्पा चिवडशेट्टी ( सभापती कृषी व पशुसंवर्धन जि.प सोलापूर) श्री अशोक भांजे ( माजी गटशिक्षणाधिकारी),श्री महादेव जंबगी ( सावित्रीबाई फुले शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष) श्री काशिनाथ भतगुणगी (ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) याच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार श्री सुहास छंचुरे ( प्रसिद्धी प्रमुख आस्था सामाजिक संस्था) वेदांत तालिकोटी ( संचालक आस्था सामाजिक संस्था ) यांनी स्विकारले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, सचिव शिवानंद सावळगी,उपाध्यक्ष चंद्रकांत शहा, सल्लागार हर्षल भाई कोठारी, सल्लागार डॉ महावीर शास्त्री, संचालक अनिल जमगे, संचालक, महेश नळे, संचालक, योगेश कुंदुर, संचालक देविदास चेळेकर,सहसचिव सिद्धू बेऊर यांनी हार्दिक अभिनंदन केले