बार्शी – शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. २९९/२०२६ मधील आरोपी सचिन कुमार मिरगणे यास अटकपूर्व जामीन, तर राजेश कुमार मिरगणे व पांडुरंग सोमनाथ सोनवणे यांना अतिरिक्त सत्र न्यायालय, बार्शी यांनी नियमित जामीन मंजूर केला.
बचाव पक्षातर्फे आरोपींचे नाव केवळ सहआरोपींच्या जबाबावरुन समोर आले असून त्यांच्याकडून कोणताही अमंली पदार्थ जप्त करण्यात आलेला नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच जप्त करण्यात आलेले गांजाचे प्रमाण हे ‘स्मॉल क्वांटिटी’ स्वरुपातील असल्याने एनडीपीएस कायद्यातील कलम ३७ लागू होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
आरोपींच्या वतीने ऍड. अक्षय बिडबाग व ऍड. एस. आर. मते यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन अतिरिक्त सत्र न्यायालय, बार्शी यांनी आरोपींना जामीन मंजूर करुन दिलासा दिला.
Post Views: 9