बार्शी – डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ, आयटक कामगार केंद्र यांच्यावतीने कल्याण डोंबिवली येथील शासकीय हॉस्पिटलमधील महिला डॉ. व कर्मचारी यांना अत्यंत मस्तवालपणे तेथील शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे व त्याच्या सहकार्य यांनी बेदम मारहाण केली असल्याच्या विरोधात डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्यासमोर आज शनिवार दि. ११ जुलै रोजी निदर्शने आंदोलन संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी जगदाळे मामा हॉस्पिटल येथील डॉक्टर, नर्स, ब्रदर व सिस्टर यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

यावेळी कॉऋ प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले, राज्यभरामध्ये शिंदे सेनेचे आमदार, नगरसेवक जनतेसोबत मस्तवालपणे, गुंडागर्दी करत आहेत. शिंदे सेना ही महाराष्ट्रातील गुंडागर्दी करणाऱ्यांचे टोळके झाली आहे. डोंबिवली येथील डॉ. महिला कर्मचारी यांच्यावर शिंदे सेनेच्या रमेश म्हात्रे याने जो हल्ला केला; हा हल्ला राज्यातील डॉक्टर व आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर केलेला हल्ला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र हे सर्व पाहून गप्प बसत आहेत, गृहमंत्रालय शांत आहे. रमेश म्हात्रेचे नगरसेवक पद रद्द करुन त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. डॉक्टर व आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील हल्ला पुढील काळात खपवून घेतला जाणार नाही. महाराष्ट्राचा बिहार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे षडयंत्र आम्ही हाणून पाडू. महिला डॉक्टरांना हाणामारी कारणावरुन महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांचा आम्ही धिक्कार करतो.
यावेळी आयटकचे जिल्हा सचिव कॉ. ए.बी. कुलकर्णी, डॉ. सुरज सावंत, डॉ. स्वप्नील मुंढे, डॉ. अशितोष लोहिया, डॉ. महेश शेळवणे, डॉ. सोनाली जगताप, डॉ. कराळे, लहू आगलावे, आनंद गुरव, भारत भोसले, संपत खताळ, प्रमोद मंडलिक, धनाजी पवार, निर्मला सरवदे, भारती मस्तुद, तानाजी बागल, गणेश तौर, शहापरी शेख, विजय खूणे , शकील मुलाणी, अमोल शेळवणे, अनिरुद्ध नखाते, भारत चव्हाण, विनोद गायकवाड, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचारक संघटनेचे सचिव प्रविण मस्तुद, शितल करडे आदी उपस्थित होते.
Post Views: 13