सोलापूर – ईरटीका कारच्या धडकेत जखमी झालेल्या हळळी गावच्या दुचाकी स्वराचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला .
रहीम हुसेन मकानदार ( वय 35 वर्ष ,रा . हळळी , ता जत , जिल्हा सांगली ) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे . तो सहा जुलै रोजी रात्री उमदी गावा कडून हळळी गावाकडे दुचाकीवरून जात असताना एरटिगा वाहनाने त्याला पाठीमागून धडक दिली होती . यात गंभीर जखमी झाल्याने त्याला एका खाजगी दवाखान्यात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात भाऊ पैगंबर मकानदार याने दुसऱ्या दिवशी दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला .
Post Views: 31