सोलापूर : दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळ, सोलापूर यांच्या वतीने ‘सप्तपदी सकल दिगंबर जैन वधू-वर पालक परिचय मेळावा–२०२६’ रविवार, दि. २६ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत नेहरू नगर, विजापूर रोड येथील सुंदर मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष अनिल जमगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेळाव्यासाठी नोंदणी शुल्क ८०० रुपये असून प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या वधू उमेदवारांना हे शुल्क परत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. उमेदवार नोंदणी फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख बुधवार, दि. १५ जुलै २०२६ आहे.
उमेदवार नोंदणी फॉर्मचा पीडीएफ हवा असल्यास ९२२६३२८२१९ या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे मागवता येईल. भरलेला अर्ज व नोंदणी शुल्क संस्थेकडे वेळेत जमा करावे. फॉर्म व शुल्क स्वीकारण्यासाठी अरविंद जमगे (सन्मती नगर, विजापूर रोड) तसेच सुमेरचंद जमालपुरे (जिनेंद्र मेडिकल, भवानी पेठ) यांच्याकडे व्यवस्था करण्यात आली आहे.
समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींसाठी योग्य स्थळांचा शोध सुलभ व्हावा, पालकांना एकाच छताखाली संवादाची संधी मिळावी आणि समाजातील वैवाहिक संबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. समाजबांधवांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष देवेंद्र शटगार, कोषाध्यक्ष अनिल माणिकशेटे, सचिव देशभूषण व्हसाळे, सहसचिव अनूप कस्तुरे, संयोजक डॉ. अजित माणिकशेटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
—-
Post Views: 51