सोलापूर – सोलापुरातील सोलापूर शहर व जिल्हा हँडबॉल असोसिएशन व अजिंक्य तारा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने संघटनेच्या मैदानावर हँडबॉल दिन अतिशय आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेच्या सर्व माजी खेळाडूंना मान देण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमास हँडबॉल संघटनेच्या मैदानावरील सर्व आजी-माजी खेळाडू उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना वरिष्ठ खेळाडूंनी ज्युनिअर हँडबॉल खेळाडूंना हँडबॉल खेळाविषयी मार्गदर्शन केले व हँडबॉल खेळामुळे आपल्या जीवना मध्ये झालेल्या अमुलाग्र बदलाबद्दल माहिती दिली व फिटनेसचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर काही वरिष्ठ खेळाडूंनी आपल्या भाषणात सरावात सातत्य राखणे खूप गरजेचे आहे हे खेळाडूंना सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. डॉ. शरण वांगी, समीर शेख, सिद्धेश्वर कोंणदे,गिरीश कुलकर्णी, अंबादास गड्डम, आप्पा बंगाळे,आकाश अमदिपूर, संगमेश हिरेमठ, श्रेयश मालप, व इतर सर्व खेळाडू उपस्थित होते. तर संघटनेचे सचिव श्री सुदेश मालप वरिष्ठ मार्गदर्शक डॉ. आनंद चव्हाण यांनी खेळाडूंना हँडबॉल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Post Views: 33