सोलापूर : आषाढी एकादशी दिनानिमित्त सखुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेत प्रशालेतील भक्तीमय वातावरणात “गजर विठूचा” हा भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर झाला.*
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार प्रशांत देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री सरस्वती मंदिर संस्थेचे सहकार्यवाह दत्तात्रय कुलकर्णी, खजिनदार सुधीर देव, जेष्ठ सदस्य रघुनाथ दामले, राहुल औरंगाबादकर, प्रशांत बडवे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता येरमाळकर, पर्यवेक्षक मुकुंद गिरी उपस्थित होते.
या भक्तिमय गीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात जय जय राम कृष्ण हरी – सुंदर ते ध्यान – या विठूचा गजर यांच्या संयुक्त गायनाने झाली. नंतर विठ्ठला तू वेडा कुंभार.. खेळ मांडीयेला… चंद्रभागेच्या तीरी… कानडा राजा पंढरीचा…विठू माउली तू माउली जगाची ….गवळण..भैरवी… अशा अनेक बहारदार गीतांचे सादरीकरण प्रशालेच्या संगीत विभागातील 20 बालचमूने सादर केले संगीत विभाग प्रमुख संतोष कोथळीकर सर यांचे मार्गदर्शन लाभले
प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता येरमाळकर यांनी केले. पर्यवेक्षक श्री मुकुंद गिरी यांनी. आभार मानले शिक्षिका अंकिता माळगी यांनी सूत्रसंचालन केले
Post Views: 13