माढा – आषाढी एकादशीनिमित्त साई पब्लिक स्कूल चा दिंडी सोहळा संपन्न करण्यात आला. श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था वेताळवाडी चे सचिव डॉ.रवी सुरवसे आणि समन्वयक शीतल सुरवसे व प्राचार्या नीता कटयारे यांच्या हस्ते माढा येथील मंदिरात श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली. मंदिरामध्ये विद्यार्थ्यांनी भजन, अभंग गाईले व सर्वांना मंत्रमुग्ध केले. विठ्ठल नामाच्या टाळ मृदुंगाच्या गजराने माढ्याला प्रति पंढरपूर झाले होते. लहान लहान मुलांनी हातामध्ये भगव्या पताका घेतल्या होत्या टाळ मृदुंग हाती घेऊन विठ्ठल नामाच्या गजराने ही दिंडी सोहळा पुढे मार्गस्थ झाला.
या दिंडी सोहळ्यासाठी ,७५० विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभाग नोंदवला. त्याचबरोबर झाडे लावा – पाणी वाचवा -देश वाचवा वारकऱ्यांना स्कूलच्या वतीने बियांचा चेंडू देण्यात आला.असे सामाजिक संदेश देणारे नामफलक दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले.सायकल रॅली काढून आपल्या परिसराचे संगोपणाचे संदेश देत विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. त्यामध्ये रिंगण सोहळा आणि महिला सुरक्षा काळाची गरज यावर पथनाट्य सादर करत माढ्यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. रवी सुरवसे, समन्वयक डॉ.शितल सुरवसे , शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंदनशिवे , साई पब्लिक स्कूल. माढाच्या प्राचार्या नीता कट्यारे, सारिका काळे ,हरिश्चंद्र इंगळे पी. एस. इंगळे उपस्थित होते. इत्यादी शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
तभा वृत्त सेवा शेखर म्हेत्रे माढा प्रतिनिधी दिनांक २६जूलै :
आषाढी एकादशीनिमित्त साई पब्लिक स्कूल चा दिंडी सोहळा संपन्न करण्यात आला. श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था वेताळवाडी चे सचिव डॉ.रवी सुरवसे आणि समन्वयक शीतल सुरवसे व प्राचार्या नीता कटयारे यांच्या हस्ते माढा येथील मंदिरात श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली. मंदिरामध्ये विद्यार्थ्यांनी भजन, अभंग गाईले व सर्वांना मंत्रमुग्ध केले. विठ्ठल नामाच्या टाळ मृदुंगाच्या गजराने माढ्याला प्रति पंढरपूर झाले होते. लहान लहान मुलांनी हातामध्ये भगव्या पताका घेतल्या होत्या टाळ मृदुंग हाती घेऊन विठ्ठल नामाच्या गजराने ही दिंडी सोहळा पुढे मार्गस्थ झाला.

Post Views: 12