सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव-सोलापूर येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी बोड्डू आदित्य अशोक याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याला विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर सुवर्णपदक जाहीर झाले आहे. आदित्यने 9.99 सीजीपीए तसेच 89.48 टक्के गुण मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव-सोलापूर कॅम्पसचे संचालक संजय नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले तसेच उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, विभाग प्रमुख प्रा. एच टी गुरमे यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळेस प्रा. आय जी शेख, प्रा. सुरज धनवे, प्रा. सुनील शाखापुरे, प्रा. शैलेजा शेळके, प्रा. अमृता रुईकर, प्रा. विनायक पालमूर, प्रा. आम्रपाली गुंड, एल सी मैंदर्गी, विनायक नाळे, जनसंपर्क अधिकारी रामकृष्ण लांबतुरे यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाच्या या यशामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Post Views: 13