अक्कलकोट – श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ वर्धापन व गुरुपोर्णिमा उत्सव निमित्य आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक भक्ती संगीत व्याख्यान अक्कलकोट वासीयांचा लोकोत्सव बनला आहे यानिमित्याने अक्कलकोट वासीयाना ख्यातनाम गायक व्याख्याते यांचे व्याख्यान , राष्ट्रीय समाज प्रबोधनकार यांचे किर्तन ‘ लोककला कन्नड गीते भावगीत भक्ती गीत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी लाभली आहे . याची सांगताही गुरुपोर्णिमा दिनी भव्य दिव्य पालखी सोहळा भजनी मंडळ दिंडीपथक ढोल ताशा लेझीम सुश्राव्य बॅन्ड पथक स्वामी रथ असा भव्य लवाजम्यासह भव्य मिरवणुक सोहळा असणार आहे . या भव्य सोहळ्याची प्रतिक्षा शिगेला पोहचली आहे .
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वर्धापन दिन व गुरुपोर्णिमा उत्सव निमित्य आयोजित विविध धर्मसंकीर्तन व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रमात प्रारंभी रंग उषेचे मध्ये प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर , संगीत संजे मध्ये प्रसिद्ध कन्नड गायक राजेश कृष्णन ‘ प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे यांचे शिव चरित्रावरील धगधगते व्याख्यान ‘ स्वर आर्या मध्ये आर्या आंबेकर ‘ पारंपारिक वाद्यातील फोक आख्यान ने रसिक श्रोत्यांची मने जिंकली . राष्ट्रीय समाज प्रबोधनकार हभप निवृती महाराज देशमुख इंदोरीकर , श्रीमंत’ दामोदरपंत मध्ये प्रसिद्ध कलाकार भरत जाधव खेळ मांडियेला मध्ये प्रसिध्द मराठी अभिनेते आदेश बांदेकर . ‘ , संभवामि युगे युगे मध्ये संस्कृती बालगुडे यांचा नृत्याविष्कार पाहुन रसिक प्रेक्षकाची मने जिंकली . हा अक्कलकोट वासीयांचा लोकोत्सव बनला आहे .
गुरुपोर्णिमा उत्सव पालखी रथ मिरवणुक लेझीम झांज ढोल बॅन्ड हालगी विविध खेळ भव्य मिरवणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागुन राहिले आहे .
Post Views: 10