बार्शी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली ॲड. पांडुरंग तानाजी घोलप यांची युवासेना सोलापूर ग्रामीण (मोहोळ-बार्शी) जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड. पांडुरंग घोलप हे गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात युवासेना व विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून संघटनात्मक काम करत आले आहेत. विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविणे, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पाठपुरावा करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीसाठी प्रयत्न करणे, एकल पालक योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच विधवा महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने काम करणे, अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे.
ॲड. घोलप हे दडशिंगे गावचे सर्वात कमी वयात निवडून आलेले माजी उपसरपंच असून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या कार्यामुळे त्यांनी युवकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक युवक पक्षाशी जोडले गेले असून संघटन विस्तारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
यापुढे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विचारधारा तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचविणे, युवकांना संघटित करून पक्ष अधिक बळकट करणे, सामाजिक बांधिलकी जपत जनहिताची कामे अधिक जोमाने राबविणे तसेच सोलापूर ग्रामीण (मोहोळ-बार्शी) परिसरात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Post Views: 32