कुर्डूवाडी : करमाळा माढा विधानसभा मतदार संघाचे माजी आ. संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती चे गटनेते प्रा डॉ आशिष रजपूत व पंचायत समिती कुर्डूवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) यांच्या वतीने सभापती पंडीत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थीतीत कै. विठ्ठलराव शिंदे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत सर्वरोग निदान, आरोग्य तपासणी व ताण-तणाव मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिराला ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
कार्यक्रमास समाज कल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे (जि.प. सोलापूर), कार्यक्रमाध्यक्ष यशवंत शिंदे (सरपंच, निमगाव टें.), पंचायत समितीचे सभापती पंडित तुकाराम देशमुख, तसेच संतोष अनभुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, हृदयरोग तपासणी, महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन, बालरोग तपासणी, नेत्र तपासणी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य सल्ला देण्यात आला. याशिवाय क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. कुमार गायकवाड यांनी ताण-तणाव व्यवस्थापन व मानसिक आरोग्य या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.
शिबिरात डॉ. सुनंदा रणदिवे, डॉ. सागर गायकवाड (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. नागेश आखाडे, डॉ. उमेश झाडबुके, डॉ. मदन कांबळे, डॉ. संतोष लोंढे, डॉ. दिग्विजय थोरात, डॉ. प्रणव सातव, डॉ. गोरखनाथ शिंदे, डॉ. अनिल बांगर तसेच डॉ. विशाल शहा यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचाराविषयी मार्गदर्शन केले.
पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी आशा स्वरूपाच्या शिबिराचे आयोजन गटनेते डॉ. अशिष आनंद रजपुत यांनी प्रथमतःच केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तिडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी नागेश पाटील, महेश शेंडे, तसेच संतोष पोतदार श्री मुकणे, मिलिंद जाधव,आणि पंचायत समितीच्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
आरोग्यदायी समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असून नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
Post Views: 7