पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पहाटेपासुन पावसाची रिमझिम सुरु झाली आहे.शुक्रवारी दिवसभर ही पावसाची रिमझिम अधुन मधून सुरुच होती.परंतू पावसाळा सुरु होऊन दोन महीने संपले तरीही अद्यापपर्यंत या भागात दमदार म्हणावा तसा पाऊस झालाच नाही .या भागात यामुळेच खरीपातील पेरणी झालीच नाही.जी पेरलेली पिके सध्या पाण्यावाचून अडचणीत आहेत.तसेच दरवर्षी सारख्या या भागात अद्यापही ऊसाच्या नवीन लागवडी झाल्या नाहीत. या भागातील शेतकरी अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या भागातील ओढे, नाले अद्यापपर्यंत वाहीलेच नाहीत.तर तलाव, तळी, बंधारे अद्यापपर्यंत कोरडेच आहेत. आता राहिलेल्या उर्वरित दोन महीन्यात तरी दमदार पावसाची या भागातील शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















