सोलापूर : सोलापूर विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्टच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कव्हेकर यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांची व विश्वस्तांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
ही बैठक शुक्रवार पेठ येथील श्री कालिका मंदिर परिसरात पार पडली. बैठकीस संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी निवडण्यात आलेले अन्य पदाधिकारी. याप्रमाणे-
प्रसाद कुमठेकर उपाध्यक्ष, उमेश कुरुलकर यांची कार्यवाह, नागेश कुरुलकर यांची खजिनदार, तर सचिन क्षीरसागर यांची सहकार्यवाह म्हणून निवड झाली. याशिवाय पुरुषोत्तम कुरुलकर, सत्यजीत कुरुलकर, जितेंद्र वेदपाठक, प्रसाद चोळचगुड, ओंकार कुमठेकर आणि अभिषेक कुरुलकर यांची विश्वस्त म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष कव्हेकर यांनी यापूर्वी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष कव्हेकर यांचा नवनिर्वाचित विश्वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या आगामी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.