सांगोला – महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून इंग्रजी विभागाच्या स्पार्क या भितीपत्रकाचे उद्घाटन प्रसिद्ध प्रवचनकार हभप.डॉ.जयवंत बोधले महाराज यांनी केले. यावेळी डॉ.भाग्यश्री पाटील यांनी स्पार्क या भितीपत्रका विषयीची माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, सचिव ॲड.उदयबापू घोंगडे, सहसेक्रेटरी साहेबराव ढेकळे, प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख प्रा.शामराव नवले उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा.प्रज्ञा उबाळे, प्रा.सुरेखा गायकवाड, प्रा.निखिल जावीर यांनी सहकार्य केले.