सांगोला – फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला मध्ये कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले विनायक भिमराव बंडगर यांना सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाकडून अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी भारतातील आर्थिक वृद्धी आणि बेरोजगारी दर : १९९१ ते २०२३ या कालावधीतील राज्यनिहाय संकलित माहितीच्या आधारे ओकुन सिद्धांताचा अभ्यास या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला होता. संशोधनाच्या निष्कर्षानुसार, भारतात आर्थिक वृद्धीमुळे बेरोजगारी कमी होते; मात्र त्याचे प्रमाण व दिशा राज्य, क्षेत्र व विभागानुसार लक्षणीयरीत्या भिन्न असल्याचे आढळून आले. विनायक बंडगर यांना पीएच.डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा नीलवर्णा रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रूपनर, डॉ.संजय आदाटे, प्राचार्य डॉ.संजय बैस, रजिस्ट्रार राजेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले.
Post Views: 7