सोलापूर – मराठी शाळेमध्ये इंग्रजी हा विषय नर्सरी पासून कसा शिकवावा आणि त्याची तयारी पालकांनीही कशी करून घ्यावी या संदर्भात कार्यशाळा घेण्यात
आली.
इंग्रजी भाषा ही जगाची भाषा आहे आपल्या विद्यार्थ्यांना ती अधिक चांगल्या प्रकारे अवगत कशी होईल आणि त्यांचा इंग्रजीचा पाया पक्का कसा होईल यासाठी पालकांनीही विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी घरी लावावी आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले असे मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
या वेळेला प्रमुख मार्गदर्शिका धनश्री विधाते यांनी पालकांच्या मनातील इंग्रजीची भीती जाण्यासाठी म्हणून पालकांचे विविध खेळ घेतले या प्रकारचे खेळ घरी देखील पालकांनी मुलांचे घ्यावेत त्याचबरोबर पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले. पालकांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कार्यशाळा घेतल्याबद्दल शाळेला धन्यवाद दिले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार सायली देशमुख यांनी मानले. अलका ओक मृणाल देशपांडे स्नेहा गजेंद्र गडकर सारिका कुलकर्णी त्याचबरोबर सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम घेतले.
——–
Post Views: 19