कुर्डूवाडी – भोसरे गावातील हद्दवाढ भागातील आरोग्य सेवेसाठी कोणतीही सोय उपलब्ध नव्हती अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न विकासरत्न मा आ संजय मामा शिंदे यांच्या शिफारशीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे सतत पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक 2 च्या सदस्या सौ सूलन रामदास बागल यांनी लसीकरण केंद्र इमारतीसाठी निधी मंजूर करून बांधकाम पूर्ण केलेले होते
सदर ठिकाणी सेवा उपलब्ध झाल्यास तेथील नागरिकांची सोय होणार आहे पंचायत समिती सदस्य गटनेते डॉक्टर आशिष रजपूत सर यांच्या पाठपुराव्याने तालुका आरोग्य अधिकारी यांनी स्वतंत्र भोसरे प्राथमिक आरोग्य केंद्र 2 म्हणून ANM नेमणूक केलेली आहे त्यामुळे गरोदर माता नियमित तपासणी, लसीकरण आणि प्रसूतीपूर्व मार्गदर्शनासाठी गरोदर महिलांना दूर इतर रुग्णालयांत पायपीट करावी लागणार नाही .बालके,नवजात बालकांच्या आवश्यक लसीकरण मोहिम .वृद्ध व आजारी व्यक्ती: गावातील वृद्ध रुग्णांना प्रथमोपचार किंवा रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांवरील नियमित गोळ्या घेण्यासाठी खाजगी वाहनाचा खर्च वाचणार आहे
आज हद्दवाढ भागासाठी नेमणूक असलेल्या ANM मार्फत आरोग्य सेवा सुरू आज सुरू करण्यात आली
लसीकरण केंद्रात सौ शुभांगी माळी मॅडम रुजू झाल्या त्याबद्दल त्यांचे स्वागत माढा तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती शीलाताई रजपूत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे गटनेते प्रा डॉ आशिष रजपूत भोसरे गावचे उपसरपंच अमोल खोत मा ग्रामपंचायत सदस्य राजू भालेराव संभाजी ब्रिगेड चे अल्ताफ भाई शेख जी प शाळेचे मुख्याध्यापक गणेश गोसावी सर आंगणवाडी च्या शिरसठ मॅडम कोळी मॅडम व महिला नागरिक उपस्थित होते