सोलापूर : ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम आणि कामगार व समाजकल्याण समितीच्या सभापती श्रद्धा किरण पवार यांच्या हस्ते विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
सिव्हिल चौकातील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉ. कोटणीस, मार्कंडेय उद्यानातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, अशोक चौकातील कै. वड्डेपली तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच मेकॅनिक चौकातील स्वातंत्र्य सेनानी तुळशीदास जाधव, सुपर मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले आणि साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले.
९ ऑगस्ट हा ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या स्मृती जागविणारा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे तसेच सामाजिक समता आणि जनजागृतीसाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास हरिष जंगम, समुदाय संघटक ऋषी लोखंडे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, विशाल माने, गुरुराज कानडे, किरण पवार यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 40