सोलापूर:-ज्ञानसंपदा शिक्षण प्रसारक मंडळ आणि अ.भा. साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूरच्या संयुक्त विद्यमाने, क्रांति-दिन साजरा करण्यात आला.
9 ते 15 ऑगस्ट या आठवड्यात विविध शाळां-शाळांमधून क्रांतिकारकांच्या प्रेरक कथा सांगितल्या जाणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक ओंकार बेडगनूर यांच्या हस्ते करण्यात आले. कथामाला कार्यकर्ते विजय बिज्जरगी यांनी भगतसिंग तर अरुण धुमाळ यांनी भाई कोतवाल यांची कथा सांगितली. कथामालेचे कार्यवाह डॉ.रामचंद्र धर्मसाले यांच्या कृति-युक्त बालगीतामुळे, कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली होती.
साने गुरुजींच्या *खरा तो एकची धर्म! जगाला प्रेम अर्पावे*!! या प्रार्थनेने कार्यक्रमानची सुरुवात झाली. कथामालेच्या विद्यमान अध्यक्षा आरती काळे यांनी क्रांतिकारी कथा सप्ताहाचा हेतू स्पष्ट केला. मुख्याध्यापक बेडगनूर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रीती स्वामी यांनी स्वागत, प्रास्ताविककेले.डॉ.धर्मसाले
यांनी सूत्रसंचालन केले, तर
सुप्रिया पंदरकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कथामालेचे विद्यमान मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष अशोक खानापुरे, राष्ट्रीय मुख्य सचिव सुनील पुजारी, उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका राजश्री बेडगनूर यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
———————–
Post Views: 39