सोलापूर : ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी शहरातील विविध महापुरुष आणि हुतात्म्यांच्या स्मारकांना अभिवादन करण्यात आले. महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बलिदान चौक येथील हुतात्मा स्तंभास पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांचे बलिदान दिलेल्या चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 37