बार्शी – गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई( ठो) शाळेने इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात सर्वाधिक निकाल दिला होता. त्यापाठोपाठ इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेतही उपळाई शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता चौथीची विध्यार्थीनीं कु.स्वराली गणेश ठोगे ही २४६ गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक झाली आहे तर इयत्ता ७ वी ची विध्यार्थीनीं कु.तन्वी राहुल ठोगे ही २२० गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक झाली आहे. या विध्यार्थ्याना वर्गशिक्षिका श्रीमती सुवर्णगौरी शिंदे, रामचंद्र बरचे, प्रभाकर काटे यांचेसह मुख्याध्यापक अनिल काळे, आनंद घाडगे, हरिभाऊ दळवी, श्रीमती दिपाली गोरे, श्रीमती वैशाली खुने,श्रीमती बेबीनंदा खडबडे, श्रीमती मीरा गरड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, विस्तार अधिकारी बालाजी नाटके, केंद्रप्रमुख श्रीराम आगलावे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सविता भोंग यांनी अभिनंदन केले आहे.