सांगोला – मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे सायबर गुन्ह्यांचा धोका वाढत आहे. अनोळखी व्यक्तीवर ठेवलेला विश्वास किंवा खात्री न करता दिलेला ओटीपी हा आर्थिक तसेच वैयक्तिक संकटाला आमंत्रण देऊ शकतो म्हणून विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दुर राहून करिअर करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी व्यक्त करत सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. ते फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे सोशल मीडिया आणि सायबर क्राईम या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सांगोला पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, उपप्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर, डॉ.संजय पवार उपस्थित होते. याप्रसंगी पो.उपनि.स्नेहल चव्हाण यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यातील विविध कलमांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. सोशल मीडिया वापर, सायबर फसवणूक, व्यसनाधीनता, रॅगिंग आणि कायद्याची माहिती अशा विविध विषयांवर झालेल्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षितता आणि कायद्याविषयी जागरूकता निर्माण झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सत्यशिल कोळेकर यांनी केले.
चौकट-
रॅगिंगपासूनही विद्यार्थ्यांनी दूर राहावे. रॅगिंगविरोधात स्वतंत्र कायदेशीर तरतुदी असून, संबंधित प्रकारात थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. चुकीच्या गोष्टीत अडकू नका; चांगले रहा, चांगले शिका’ सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा, युवकांनी चुकीच्या गोष्टींच्या आहारी न जाता शिक्षण, कौशल्य आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे.
-राहूल देशपांडे, पो.नि.सांगोला
Post Views: 18