बार्शी – देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने ग्लोबल व युनिव्हर्सल स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने पूणे येथे घेण्यात आलेल्या नाॅनस्टाॅप स्केटींग वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बार्शीच्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब संचलित विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेसच्या १४ खेळाडूंनी तब्बल ८० मिनिटे नाॅनस्टाॅप स्केटींग करत आपले कौशल्य सिद्ध करुन युनिव्हर्सल व ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे..
रेकाॅर्ड मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले खेळाडू पूढील प्रमाणे- आदित्य बागुल, शौर्य नागशेट्टी, शिवांश सारुक, अभिनव बावकर, रुतुराज शिंदे, धैर्य घोलप, आरुष जाधव,
लावन्या मुद्दे, संचिती जाधव, यशराज रोडे, माही पवार, अर्णव सांगळे, श्रीराज काळे, आरोही काकडे.
वरील यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष- भगवान जाधव, उपाध्यक्ष/प्रशिक्षक- गणेश रोडे, सचिव- सौ.सविता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तसेच संस्थेच्यावतीने या खेळाडूंनचे सौ.स्नेहल रोडे, विश्वजीत जाधव, आदित्य माळी, यश नान्नजकर, या सर्व सहप्रशिक्षकांनी व सर्व पालकांनी या सर्व खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
Post Views: 20