सांगोला – येथील शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव अंकुशराव गायकवाड यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे सामूहिक गायन केले. याप्रसंगी विद्यार्थिनी ऐश्वर्या यादव व समीक्षा लिगाडे यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘व्यसनमुक्त विद्यार्थी-व्यसनमुक्त महाराष्ट्र’ ही सामूहिक प्रतिज्ञा घेतली. तसेच ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत कॉलेजच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.