बार्शी – शहरातील श्री शिवाजी महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिच्याशी अश्लील वर्तन तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.
दि. १३ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलगी मैत्रिणीसोबत श्री शिवाजी महाविद्यालयात फोटो घेण्यासाठी जात होती. त्यावेळी आरोपी शेखर पोपट वाघमारे (रा. सिद्धार्थनगर, बार्शी; सध्या रा. पुणे) हा स्कूटीवरुन तिच्या पाठीमागून आला. आरोपीने मुलीला थांबवून स्कुटीवर सोबत येण्यास सांगितले. तसेच तिच्याशी अश्लील व अपमानास्पद शिवीगाळ करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे..
या प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे करत आहेत.
Post Views: 26