सोलापूर – मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असून येथील आरोग्य सेवा ‘रामभरोसे’ चालली असल्याचे चित्र आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या भागातील सामान्य आणि गरीब रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील ढिसाळ नियोजनाचा फटका थेट सर्वसामान्यांच्या आरोग्याला बसत आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे
मंद्रूप ग्रामीण रूग्णालयात एकाच परिचारीकेवर उपचाराचे ताण पडत असून रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. यामुळे नाईलाजास्तव इतर विभागांतील परीचारीकांना बोलावून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. या तात्पुरत्या आणि ओढाताणीच्या व्यवस्थेमुळे रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.
रुग्णालयातील एका कनिष्ठ लिपिकाच्या जाचक आणि त्रासदायक वर्तनाचा परिणाम संपूर्ण रुग्णालयाच्या कामकाजावर होत आहे. या लिपिकाच्या त्रासामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष असून, याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर आणि रुग्णालयाच्या प्रशासकीय शिस्तीवर होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
…,
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; रुग्णांचा संताप
…..
..
कनिष्ठ लिपिकाचा मनमानी कारभार
…
कनिष्ठ लिपिक मेहमूद सुभेदार यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामीण रूग्णालयामधील कर्मचारी वैतागले आहेत. शिवाय परीचारीकांसह इतर कर्मचारी ग्रामीण रूग्णालयात बदली झाल्यानंतर कामकाज करण्यास नकार देत आहेत.
मंद्रूप ग्रामीण रूग्णालयातील कनिष्ठ लिपिक सुभेदार यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. भाजपाचे गौरीशंकर मेंडगुदले व शिवराज कालदे यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सामान्य रूग्णांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
….


















