सोलापूर – पवित्र पोर्टलद्वारे सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला ३४९ नवीन शिक्षक मिळाले आहेत. कागदपत्र पडताळणी प्रक्रियेस ३३२ उमेदवार हजर राहिले तर १७ उमेदवार गैरहजर राहिले. भावी शिक्षकांच्या कागदपत्रात पडताळणीची प्रक्रिया बुधवार व गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नेहरू वसतिगृह येथे शिक्षण विभागामार्फत पार पडली. कागदपत्र पडताळणी नंतर आता त्या उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा लागली आहे.या पडताळणी दरम्य
या पडताळणी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, जात, आरक्षण तसेच पवित्र पोर्टलवर सादर केलेल्या सर्व मूळ कागदपत्रांची सखोल तपासणी प्राथमिक शिक्षण विभागाच्या पथकाकडून करण्यात आली. या पडताळणीस शासन निर्देशानुसार ३६ कागदपत्राचे पडताळणी करण्यात आली. कागदपत्र पडताळणीसाठी प्रत्येकी तीन अधिकाऱ्यांच्या सात टीम करण्यात आल्या होत्या. प्रत्येक टीम कडे २५ उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
चौकट
प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक
पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीची प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. रिक्त जागांचा आढावा घेऊन उमेदवारांना पदस्थापना देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी दिली.
Post Views: 13