सोलापूर : अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूरच्या वतीने शिक्षक दिना निमित्त उल्लेखनिय कार्य केलेल्या शहर व जिल्ह्यातील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक तसेच मुख्याध्यापकांचा उत्कृष्ठ मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार देऊन शनिवार दि.05/09/2026 रोजी सायं. 7.00 वाजता कॉ.बेरीया शैक्षणिक संकुल नवीन हॉल लष्कर येथे मा.श्री. दिलीरावजी माने – माजी आमदार तथा चेअरमन – कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या शुभहस्ते व मा.श्री. मुल्हारी माने – प्रशासनाधिकारी, सोलापूर महानगरपालिका यांचे उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. उर्दू भाषेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना त्यांनी घेतलेले परिश्रम, राबविलेले विविध उपक्रम तसेच शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तु, शाल व श्रीफल देऊन यथोचित गौरव करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी एकुण 14 जणांना गुणवंत पुरस्तकाराने सन्मानित करण्यात येत असुन यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 8 शिक्षक, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 4 मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक विभागातील 1 व क्रिडा विभागातील 1 अश्या 14 गुरुजनांचा समावेश आहे. तसेच सोलापूर शहरातील सर्वोत्कृष्ठ माध्यमिक शाळा म्हणुन एम.ए.पानगल ऍ़ग्लो उर्दू हायस्कुल तर सर्वोत्कृष्ठ प्राथमिक शाळा म्हणुन नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेला पुरस्कार देण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त करणारे प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक
अ.क्र. शिक्षकांचे नाव शाळेचे नाव पुरस्कार
1 शाहीदाबेगम जावेदअहमद लालकोट ख्वाजा बंदानवाज उर्दू हायस्कुल मुख्याध्यापिका
2 तबस्सुम बानो सलीम सय्यद म.न.पा. कुर्बान हुसेन मुलांची शाळा मुख्याध्यापिका
3 सॉलेहा फजल खान एस.एस.ए. उर्दू प्रा. शाळा, विडी घरकुल मुख्याध्यापिका
4 शहनाज म.शफीक करजगीकर जि.प. उर्दू शाळा विडी घरकुल मुख्याध्यापिका
5 सादेका आईने हयात बारागझी दि प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कुल शिक्षिका
6 रिजवानअहमद अ.जलील शेख एस.एस.ए. उर्दू हाय.ऍ़ण्ड ज्यु. कॉलेज शिक्षक
7 तलत तेहसीन नबीलाल मुजावर म.न.पा. मुलांची केंद्र शाळा शिक्षिका
8 अजीम अन्वरसाब शेख म.न.पा. मुलांची शाळा – गरीबी हटाव शिक्षक
9 नुजहत परवीन अबुलकलाम शेख बीबी हयात उर्दू प्रा.शाळा शिक्षिका
10 अशरफ लायकअली पटेल चाँदतारा उर्दू प्रायमरी शाळा शिक्षक
11 रईसा महेमुद अमलीचंगे जि.प. उर्दू प्रा.शाळा, शिरुर, अक्कलकोट शिक्षिका
12 म.सबील म.उस्मान नाईक जि.प. प्राथमिक शाळा विडी घरकुल शिक्षक
13 जैनोद्दीन अब्बासअली पटेल सोशल आर्टस ऍ़ण्ड कॉमर्स कॉलेज श्क्षिक
14 वसीमबारी अ.गनी शेख सोशल उर्द हायस्कुल बिडी घरकुल क्रिडा शिक्षक
आदर्श शाळा पुरस्कार
1 एम.ए.पानगल ऍ़ग्लो उर्दू हायस्कुल
2 नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा
Post Views: 16