सोलापूर : पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुंबईतील शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात भेट देऊन श्री सिद्धेश्वरांचे भावपूर्ण दर्शन घेतले.
मंदिरात आगमन झाल्यानंतर श्री सिद्धेश्वर मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष धर्मराज काडादी आणि मंदिर समितीचे सदस्य विश्वनाथ लब्बा यांनी आमदार अजय चौधरी यांचे जलोषात स्वागत करून त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी मंदिर समितीच्या माध्यमातून वर्षभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध धार्मिक सणांची व उत्सवांची माहिती दिली. यासोबतच मंदिर समितीच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थांच्या कार्याचा आढावा त्यांनी मांडला. देवस्थानच्या या सामाजिक व धार्मिक कार्याची माहिती घेऊन आमदार अजय चौधरी यांनी तीव्र समाधान व्यक्त करत मंदिर समितीच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले.
या सोहळ्याप्रसंगी आमदार अजय चौधरी यांच्यासमवेत शिवसेनेचे स्थानिक व मुंबईतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये सोलापूर महानगरप्रमुख महेश धाराशिवकर, शहर उपप्रमुख बंटी बेळमकर, शिवसैनिक भूपाल भूमकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रथमेश जगताप, नवज्योत बांदिवडेकर, अश्विनी बांदिवडेकर, गजानन सुर्वे, सदाशिव भांदिगरे, राजा देशमुख, मिलिंद पेडणेकर आणि राकेश गुरव यांच्यासह इतर मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 10