सांगोला – एस टी स्टॅण्ड परीसरामध्ये १० ग्रॅम वजनाच्या गंठण चोरीची २४ तासाच्या आत उकल करण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी अनिता बाळासाहेब सावंत (वय-४५), रा.वासुद, ता.सांगोला ह्या सांगोला ते पारे जाण्यासाठी एस टी स्टॅण्डवर आल्या. त्यावेळी त्यांच्या पाकीटा मधील १० ग्रॅम वजनाचे मणी मंगळसुत्र चोरीला गेले. याबाबत सांगोला पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत आरोपी सिनाबाई सुनिल शिंदे (वय-३६), रा.खडकी, ता.मंगळवेढा, जि.सोलापूर यांचे ताब्यातून १ लाख ३० हजार रू कींमतीचे १० ग्रॅम वजनाचे गंठण जप्त करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रेरणा कट्टे, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोसई.संदीप गुरव, पोहेकॉ.नवनाथ सावंत, मच्छिंद्र राजगे, शिवाजी पांढरे, पोकॉ.मारुती पांढरे, सद्दाम नदाफ, गणेश काळे, मपोना.सोनाली सावंत यांनी केली.
Post Views: 25