माळशिरस – माळशिरस शहर व परिसरात घरोघरी उत्साहात गौरीचे आगमन झाले.
घरोघरी मोठ्या उत्साहात भक्ती भावात ‘गौरी आल्या सोन्याच्या पावलाने’, गौरी आल्या मोती पोवळाच्या पावलाने च्या जयघोषात आज आगमन झाले.आज गौरीचे आगमन असल्याने सकाळ पासून महीलाची लगबग सुरू होती.तर गौरी सजावट करण्यासाठी कुटुंबातील सदस्य मदत करीत होते.उद्या गौरीचे पूजन व जेवण.पुजनादिवशी महिला हळदी कुंकवांसाठी घरोघरी जातात.तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.





















