Thursday, November 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्घाटन सोहळा उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
September 17, 2026
in west maharashtra
0
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्घाटन सोहळा उत्साहात
0
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन बुधवार, दि. १६ सप्टेंबर  रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव, नेतृत्वगुण, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे प्रा. समाधान विठ्ठल लोंढे तर अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. के. बी. चपटे होते. प्रास्ताविक प्रा. के. एम. माळी यांनी केले.
प्रमुख पाहुणे प्रा. समाधान लोंढे यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ शिबीर किंवा उपक्रमांपुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची आणि समाजाशी नाते दृढ करण्याची प्रभावी चळवळ असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजातील विविध प्रश्न समजून घेऊन त्याच्या निराकरणासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी काही तरी करण्याची वृत्ती’ विद्यार्थ्यांनी अंगीकारावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. चपटे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजजीवनाचा अनुभव मिळतो आणि त्यातून त्यांच्यामध्ये नेतृत्व, संघभावना, शिस्त व सामाजिक जाणीव विकसित होते, असे नमूद केले. आगामी सात दिवसीय निवासी शिबिरासह वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका निशा पवार व श्रावणी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  एनएसएसच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्याची संधी मिळत असून, या उपक्रमांमधून सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी आणि सेवाभाव विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस वैष्णवी जाधव हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन प्राची मस्तूद व शिवानी पवार यांनी केले.
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे २०० विद्यार्थ्यांचे युनिट असून, उद्घाटन कार्यक्रमास १५८ स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरुप प्राप्त झाले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजातील वंचित घटक, पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, सामाजिक प्रबोधन आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. एम. पी. शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.
Views: 177
Previous Post

कुत्रे आडवे आल्याने मोटारसायकलचा अपघात; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

ऐन सणासुदीत नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ऐन सणासुदीत नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

ताज्या बातम्या

#breakingnews #diwalispecial #bjp #solapurnews

November 11, 2026

दिवाळी पाडव्याला सोलापुरात बससेवेचा शुभारंभ!

November 11, 2026

#breakingnews #bjp #solapur #maharashtra

November 10, 2026

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1491956

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!