मोडनिंब – मोडनिंब (ता.माढा) येथे गणेशोत्सव निमित्त श्री एकदंत गणेश तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ११३ दात्यांनी सहभाग नोंदविला. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्या विविध आजार, अपघात तसेच शस्त्रक्रियांच्या वेळी रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये. याच अनुषंगाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.प्रसंगी रुग्णांना रक्ताची गरज अधिक प्रमाणात भासते.हीच गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असल्याचे एकदंत मंडळाचे जय लादे यांनी सांगितले. सदर शिबिराचे आयोजन संत रोहिदास महाराज नगर येथे करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले.शिबिर यशस्वीतेसाठी श्री एकदंत गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी यांनी परिश्रम घेतले.
गणेशोत्सवानिमित्त रविवार दि. २० रोजी महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा आयोजित केली आहे.अन्नदान आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिरात ११३ जणांनी रक्तदान केले. गणेशोत्सवात मनोरंजनासोबत सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे एकदंत मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.






















