पिलीव – गौरी गणपती महोत्सवात सामाजिक सलोखा,शांतता राखून ,समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सर्व सण उत्सव एकत्रितपणे शांततेच्या वातावरणात साजरे करण्यासाठी व साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अकलूज विभागाचे पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली व माळशिरस तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल नवले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दूर क्षेत्राच्मा कार्यक्षेत्रातील पिलीव मुख्य पेठेतून काट्या व संरक्षक ढाल शस्त्र बंदुका हाती घेउन रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चचे नेतृत्व पोलीस निरीक्षक विशाल नवले यांनी केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नाथा गळवे ,पोलीस हवालदार, मसाजी थोरात ,शंकर मरळे, नितीन लोखंडे, गोपाळ घोळवे तसेच एस आर पी ची टीम, होमगार्ड ची टीम,सोलापूर ग्रामीण व,माळशिरस पोलीस ठाण्याचा पोलीस स्टाफ होमगार्ड सहभागी झाले होते यावेळी सायरन वाजवणारी गाडी व ग्रामीण पोलीस विभागाची पिंजरा मोठी गाडी तैनात करण्यात आली होती या रूट मार्च कडे नागरिक ग्रामस्थ उत्सुकतेने पाहताना दिसत होते
Post Views: 11