सोलापूर – मध्य रेल्वेच्या पुणे विभागात हडपसर–घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक अभियांत्रिकी, सिग्नल ॲन्ड टेलिकॉम तसेच ओव्हरहेड उपकरणे संबंधित महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी पुणे आणि हडपसर यार्ड येथे विस्तृत प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहेत.
ही कामे 19.09.2026 (शनिवार) ते 04.10.2026 (रविवार) या 15 दिवसांच्या कालावधीत करण्यात येणार आहेत. या कालावधीत रेल्वे मार्गांची उपलब्धता आणि ट्रॅफिक ब्लॉकमुळे गाड्यांच्या परिचालनावर लक्षणीय परिणाम होणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करणे, काही गाड्यांचे मार्ग वळविणे, काही गाड्या अंशतः रद्द स्थानकापर्यंत चालविणे किंवा अंशतः त्या स्थानकातून सुरू करणे, काही गाड्यांचे नियमन करणे तसेच काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
चौकट
या गाड्या राहतील रद्द
12169 पुणे–सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस हि दिनांक 19.09.2026 ते 23.09.2026 तसेच 03.10.2026 व 04.10.2026 दरम्यान रद्द असेल.
12170 सोलापूर–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस हि दिनांक 19.09.2026 ते 23.09.2026 तसेच 03.10.2026 व 04.10.2026 दरम्यान रद्द असेल.
12116 सोलापूर–सीएसएमटी मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस हि दिनांक 03.10.2026 रोजी रद्द असेल.
12115 सीएसएमटी मुंबई–सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस हि दिनांक 04.10.2026 रोजी रद्द असेल.
12158 सोलापूर–पुणे हुतात्मा एक्स्प्रेस हि दिनांक 04.10.2026 रोजी रद्द असेल.
12157 पुणे–सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस हि दिनांक 04.10.2026 रोजी रद्द असेल.
चौकट
या गाड्यांच्या मार्गात बदल
22159 सीएसएमटी मुंबई–एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस हि गाडी दिनांक 19.09.2026 ते 23.09.2026 तसेच 04.10.2026 रोजी कल्याण–इगतपुरी–मनमाड–दौंड मार्गे वळविण्यात येईल. (वगळण्यात येणारी स्थानके: कर्जत, लोणावळा, खडकी, पुणे आणि दौंड)
11019 सीएसएमटी मुंबई–भुवनेश्वर एक्स्प्रेस हि गाडी दिनांक 20.09.2026 रोजी पुणे–सातारा–मिरज–पंढरपूर–कुर्डु
17222 एलटीटी मुंबई–काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस हि गाडी दिनांक 20.09.2026 रोजी पुणे–सातारा–मिरज–पंढरपूर–कुर्डु
16340 नागरकोईल–एलटीटी मुंबई एक्स्प्रेस हि गाडी दिनांक 22.09.2026 व 02.10.2026 रोजी सोलापूर–कुर्डुवाडी–दौंड–अहिल्या
चौकट
या गाड्यांच्या वेळेत होणार बदल
12157 पुणे–सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस हि गाडी दिनांक 19.09.2026 रोजी पुण्याहून सायंकाळी 06:20 वाजता आणि दिनांक 21.09.2026 व 22.09.2026 रोजी 06:10 वाजता सुटेल. (नियोजित सुटण्याची वेळ : सायंकाळी 05:50 वाजता)
22732 सीएसएमटी मुंबई–हैदराबाद एक्स्प्रेस हि गाडी दिनांक 20.09.2026 रोजी सीएसएमटी मुंबई येथून सायंकाळी 04:10 वाजता सुटेल (नियोजित सुटण्याची वेळ : दुपारी 02:10 वाजता)
17222 एलटीटी मुंबई–काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस हि गाडी दिनांक 04.10.2026 रोजी एलटीटी मुंबई येथून दुपारी 03:15 वाजता सुटेल. (नियोजित सुटण्याची वेळ : दुपारी 01:15 वाजता)





















