मोडनिंब – माढा तालुक्यातील तुळशी (ता. माढा) गावाचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करावा, या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण शुक्रवारी पाचव्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आश्वासन दिल्यावर तुळशीतील पाणी टाकीवर चढून युवकांनी सुरु केलेले आंदोलन,शेतकऱ्यांनी सुरु केलेले उपोषण मागे घेण्यात आले. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी उपोषणकर्ते मनोज शहा व सरपंच डॉ. शरद मोरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. आमदार अभिजित पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली.तुळशीतील पाणी टाकीवर चढून युवकांनी सुरु केलेले आंदोलन, लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. शिवाय निर्णय द्या, अन्यथा टाकीवरून उड्या मारून आत्महत्या करू,अशी भूमिका युवकांनी घेतली.आमदार अभिजित पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानी मंगळवारी मंत्रालयात ग्रामस्थांसोबत बैठक घेण्याचे मान्य केले.यानंतर ग्रामस्थांनी लढा पुढे सुरूच ठेवणार असल्याचे सांगून उपोषण तात्पुरते स्थगित केले. आमदार अभिजित पाटील, माजी सभापती शिवाजी कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील, तहसीलदार संजय भोसले, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता मणलोर, पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ आदींच्या हस्ते आंदोलकांनी लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. योजनेबाबत मागणीवरून आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर आमदार अभिजीत पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत आत्मदहनाचा मार्ग न स्वीकारता चर्चेतून प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. यानंतर सुमारे दोन तास आंदोलकांशी चर्चा करण्यात आली. सीना-माढा योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत. तुर्तास आंदोलन केवळ स्थगित केले असून, सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन उभारू, असा इशारा तुळशी करानी दिला.
गुरवारी माढ्यात थाळीनाद करत काढला होता मोर्चा
पंचवीस वर्षांपासून अनेक आंदोलने करूनही सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कायमस्वरूपी मिळत नसल्याने संतप्त तुळशी गावकऱ्यांनी ‘आमचे गाव विक्रीस काढले आहे, कोणीतरी विकत घ्या’ अशी आर्त हाक देत वतीने माढा तहसील कार्यालयावर थाळीनाद आंदोलन केले.शेतकऱ्यांनी तुळशीमध्ये अन्नत्याग आंदोलन केले. प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाहि काढला होता.




















