करकंब – प्रत्येक गणेश मंडळांनी समाजोपयोगी कार्यक्रम राबवावेत.तसेच प्रत्येकांनी एक झाड लावून वृक्षारोपण उपक्रमास हातभार लावावा.असे आवाहन करकंब पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शाम गायकवाड यांनी केले.आंबेमळा,करकंब येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानने गणेश उत्सवानिमित्ताने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अमोल पब्लिक स्कूल येथे चित्रकला,सुंदर हस्ताक्षर व वकृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते.या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व रोख बक्षिसे देण्यात आली.यावेळी सपोफौ लक्ष्मण भांगे,वैभव शिंदे,विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल सलगर,सचिव अमोल खपाले,प्रा.किसन सलगर,शिवाजी सलगर,दत्तात्रय जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.स्पर्धा परीक्षांचे परिक्षण दत्तात्रय खंदारे,लक्ष्मण जाधव,संजय सांगोलकर यांनी केले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुनिल जाधव,उल्हास खपाले,शिवाजी सलगर,महेश चौगुले,तानाजी सलगर,महेश जाधव,अमोल खपाले,सुनिल सलगर,प्रा.किसन सलगर,वैभव जाधव तसेच शिक्षकवृंदानी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव जाधव यांनी तर आभार प्रा.किसन सलगर यांनी मानले.
Post Views: 20